कुर्ला येथील नाल्यात तरुणीचा मृतदेह मिळाला !

मुंबई – पतीसमवेत अनैतिक संबंध असणार्‍या तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह हात-पाय बांधून गोणीमध्ये घालून नाल्यात टाकल्याची घटना दोन दिवसांपूर्वी कुर्ला येथे घडली. नेहरूनगर पोलिसांनी तपास करून तीन महिलांना अटक केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कुर्ला कसाईवाडा परिसरातील एका नाल्यातून अग्नीशामक दलाच्या साहाय्याने पोलिसांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. एका रिक्शाचालकाने संबंधित महिलांना संबंधित परिसरात सोडल्याचे सांगितले. मीनल पवार या महिलेच्या पतीचे या तरुणीसमवेत संबंध होते. चार दिवसांपूर्वी या तरुणीला आरोपी महिलेच्या पतीने माहुल गाव परिसरात राहणार्‍या शिल्पाच्या घरी ठेवले होते. आरोपी महिला तरुणीला इमारतीच्या छतावर घेऊन गेली आणि तेथे तिची गळा आवळून हत्या केली.