किल्ले शिवनेरी (पुणे) येथील ‘श्री शिवाईदेवी’ मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची मागणी !

‘श्री शिवाईदेवी’

पुणे – किल्ले शिवनेरीवरील ‘श्री शिवाईदेवी’च्या मूर्तीची झीज झाली असून मूर्तीला तडे गेले आहेत. कुसूर येथील ‘श्री शिवाईदेवी मंदिर ट्रस्ट’ने या मूर्तीच्या जागी नवीन मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा निर्णय घेतला आहे. ‘श्री शिवाईदेवी’ची मूर्ती पालट करण्याची अनुमती मिळावी, अशी मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी आणि भारतीय पुरातत्व विभागाचे महासंचालक यांच्याकडे केली आहे.

शिवनेरी किल्ला संरक्षित स्मारक असल्याने भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित आहे. पुरातत्व विभागाने गडावरील ‘श्री शिवाईदेवी’ मंदिराच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि गडावरील देवीचे मंदिर ही प्रेरणास्थाने अन् श्रद्धास्थाने आहेत. मंदिरातील जुन्या मूर्तीप्रमाणेच कुशल कारागिरांकडून नवीन मूर्ती सिद्ध करण्यात आल्या आहेत.