परीक्षेला उपस्थित विद्यार्थ्यांना निकालामध्ये दाखवले अनुपस्थित !

सोलापूर विद्यापिठाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर

प्रतिकात्मक छायाचित्र

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्या बी.ए. भाग तीनच्या इतिहास विषयाच्या परीक्षेला ५० हून अधिक विद्यार्थी उपस्थित असूनही अनुपस्थित दाखवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा निकाल अनुत्तीर्ण लागला आहे. एकीकडे हजेरीपत्रकावर उपस्थिती, तर दुसरीकडे निकालावर अनुपस्थिती. यावरून सोलापूर विद्यापिठाच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. (यापूर्वीही सोलापूर विद्यापिठातील परीक्षांमधील अक्षम्य चुका समोर आल्या आहेत. विद्यापिठातील या अपप्रकारांवर कुणाचेच नियंत्रण कसे नाही ? चुका करणार्‍यांना कठोर शिक्षा देणेच आवश्यक ! – संपादक) हा प्रकार ‘शिवाजी नाईट विद्यालय’ या केंद्रावर परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात घडला आहे. यामध्ये विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

संपादकीय भूमिका

  • विद्यापिठातील कर्मचार्‍यांच्या भोंगळ कारभारामुळे होणारी विद्यार्थ्यांची हानी कोण भरून काढणार ?
  • सोलापूर विद्यापिठाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर विद्यापिठामध्ये असे घडणे संतापजनक ! विद्यापिठाचा कारभार असा असेल, तर अशा  विद्यापिठामध्ये विद्यार्थी कसे घडणार ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?