मुंबई महापालिकेचा निर्णय !
मुंबई – रस्ते घोटाळ्यामध्ये दोषी ठरलेल्या मे. आर्.पी.एस्. इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. या कंत्राटदाराला नवीन काम देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या प्रशासनाने सिद्ध केला आहे. नायर रुग्णालयाच्या टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालयाच्या इमारतीची दुरुस्ती आणि नूतनीकरण यांचे काम या कंत्राटदाराला देण्यात येणार आहे. ७१ कोटी ३० लाख ५७ सहस्र रुपये खर्चाचे हे काम आहे. न्यून खर्चात काम करण्याची सिद्धता दर्शवल्याने या कंत्राटदारांची निविदा प्रशासनाने संमत केली आहे.‘आर्.पी.एफ्. इन्फ्रा प्रोजेक्ट्स’ हे पालिकेतील नोंदणीकृत कंत्राटदार होते. वर्ष २०१७ मध्ये पालिकेत झालेल्या रस्ते घोटाळ्यात दोषी ठरल्याने रस्ते विभागाने चौकशीनंतर २२ मार्च २०१७ पासून ३ वर्षांसाठी या कंत्राटदारास काळ्या सूचीत टाकले होते. त्यानंतर कंत्राटदाराला पुन्हा नोंदणी करण्यास प्रशासनाने संमती दिली.
संपादकीय भूमिकादोषी कंत्राटदाराने या कामातही घोटाळा केला, तर त्याला उत्तरदायी कोण ? तसे झाल्यास संबंधित अधिकार्यांकडून या कामाचा खर्च वसूल करावा ! |