जळगावमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण

निरपराध हिंदूंना अमानुष मारहाण करून मर्दुमकी गाजवणारे पोलीस अन्य पंथियांसमोर गुडघे टेकतात, हे लक्षात घ्या ! अशा पोलिसांच्या विरोधात हिंदूंनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा घेणे आवश्यक !

राजकीय पक्षांकडून होणार्‍या धार्मिक चिन्हे आणि नावे यांच्या वापरावर बंदीची मागणी

राज्यघटनेचा संदर्भ देत रिझवी यांनी ‘धर्माच्या आधारे मतदारांना आकर्षित करणे अवैध आहे’, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकादाराच्या वतीने अधिवक्ता गौरव भाटिया यांनी न्यायालयात बाजू मांडली.

अंकिता सिंहला मारणार्‍या आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या जिहाद्यांना कठोर शिक्षा करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

धनबाद (झारखंड) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’चे आयोजन

गुरु मडीवाळेश्वर मठाचे बसवसिद्धलिंग स्वामीजी यांची आत्महत्या !

या प्रकरणी स्वामीजींनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘मी काहीही चुकीचे केलेले नाही. माझ्या मृत्यूचे कारण मीच आहे. कुणाचेही अन्वेषण करू नका.

हणजुणे येथील वादग्रस्त ‘कर्लिस’ उपाहारगृहाजवळील बंद खोलीत कुजलेला मृतदेह आढळला !

हणजुणे येथील वादग्रस्त ‘कर्लिस’ उपाहारगृह पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे. या उपाहारगृहानजीक काही अंतरावर असलेल्या एका बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे. यामुळे पुन्हा संशयाचे वादळ घोंगावत आहे.

‘ईडी’कडून देशभरात ३० ठिकाणी धाडी !

आम आदमी पक्षावर आरोप करत भाजपने ५ सप्टेंबर या दिवशी एका ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये मद्य घोटाळ्यातील आरोपीचे वडील देहलीत मद्याचा परवाना घेतल्याचा दावा करतांना दिसत आहेत, तसेच त्यासाठी ‘कमिशन’ दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

आळंदी नगर परिषदेने इंद्रायणी नदीत मूर्तीविसर्जनास बंदी घातल्याचे प्रकरण !

हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी करून हिेंदूंना श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करू देण्यास रोखणारे धर्मद्रोही प्रशासन ! गणेशभक्तांकडून विश्वासाने घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे धार्मिक पावित्र्य जपून विसर्जन होणे अपेक्षित असतांना तसे केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला !

आर्थिक अपव्यवहार प्रकरणात ‘अंमलबजावणी संचलनालया’ने (‘ईडी’ने) मागील वर्षी अनिल देशमुख यांना ११ घंट्यांच्या चौकशीनंतर अटक केली होती.

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केल्याने पुण्यात अनेक ठिकाणी भाविकांची गैरसोय !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गैरसोय करणारे महापालिका प्रशासन हिंदुद्वेषीच म्हणावे लागेल. धर्मशास्त्रविरोधी हौदात मूर्तीविसर्जन, रासायनिक प्रक्रियेने मूर्तीविसर्जन, मूर्तीदान हे उपक्रम न राबवता वहात्या पाण्यात भाविकांना मूर्तीविसर्जन करू दिले असते, तर त्यांची गैरसोय झाली नसती !