अंकिता सिंहला मारणार्‍या आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या जिहाद्यांना कठोर शिक्षा करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

धनबाद (झारखंड) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’चे आयोजन

एरव्ही हिंदु महिलांवरील कथित अत्याचारांवर कंठशोष करणारे स्त्रीमुक्तीवाले अंकिता सिंहच्या हत्येवर मौन का ?

‘अंकिता सिंह हिच्या हत्याऱ्याला फाशी द्या’, या मागणीसाठी धनबाद (झारखंड) येथे आंदोलन करतांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी

धनबाद (झारखंड) – राज्यातील दुमका येथे शाहरुख नावाच्या धर्मांधाने १२ वीत शिकणार्‍या अंकिता सिंह हिला पेट्रोल टाकून जिवंत जाळून मारले. त्याच प्रकारे नरकोपी, रांचीमध्ये २३ वर्षांच्या सहरूद्दीन अंसारी याने एका १५ वर्षींय अदिवासी मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. एका विशिष्ट समाजाकडून हिंदु मुलींना परत परत लक्ष्य करण्यात येत आहे. अशा घटनांवर प्रतिबंध घालण्यात आला नाही, तर सामाजिक दृष्टीकोनातून झारखंडची स्थिती अत्यंत विस्फोटक होऊ शकते. हे लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटना यांनी येथील रणधीर वर्मा चौकामध्ये ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ केले. त्यानंतर धनबाद जिल्हा उपायुक्त संदीप सिंह यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या आंदोलनामध्ये सर्वश्री ‘तरुण हिन्दू’चे डॉ. नील माधव दास, उज्ज्वल बॅनर्जी, नंद दुलाल सेनगुप्ता, विश्व हिंदु परिषदेचे दीपक मंडल, हिंदु जनजागृती समितीचे पूर्व एवं पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक शंभू गवारे तथा अमरजीत प्रसाद, दीपक केशरी, समरपाल सिंह, धर्मप्रेमी अधिवक्ता सुदीप गुप्ता, अधिवक्ता संतोष कुमार आदी ६० हून अधिक धर्मप्रेमी सहभागी झाले होते.

आंदोलनातील मागण्या

१. कु. अंकिताचा मारेकरी शाहरुख याला फाशीची शिक्षा द्यावी आणि या घटनेच्या मागे असणार्‍या सूत्रधारांनाही कठोर शिक्षा करावी.

२. अशा घटना परत होऊ नयेत, यासाठी केंद्र सरकारने त्वरित ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करावा.

३. नरकोपी येथील मुलीवर बलात्कार करणार्‍या सहरूद्दीन अंसारीला जलदगती न्यायालयाच्या माध्यमातून कठोर शिक्षा देण्यात यावी.