आळंदी (जिल्हा पुणे) येथे १ सहस्र मूर्ती संकलित
आळंदी (जिल्हा पुणे) – इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नगर परिषदेने गणेशभक्तांना इंद्रायणी नदीत मूर्तीविसर्जन करण्यास बंदी केली आहे. नदीकाठी ‘बॅरिकेट्स’ उभारल्याने दगडी घाटावर येण्याचे मार्ग बंद केले आहेत. आळंदी आणि दिघी पोलिसांच्या वतीने नदीकाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे २ दिवसांत १ सहस्रांहून अधिक मूर्ती आणि अर्धा टन निर्माल्य संकलित झाले आहे. पाचव्या दिवसापासूनच श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविक गर्दी करणार असल्याने आळंदी नगर परिषदेने अगोदरच मूर्ती संकलनासाठी ३ ठिकाणी नदीकाठी मंडप उभारून मूर्ती संकलित केल्या.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी करून हिेंदूंना श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करू देण्यास रोखणारे धर्मद्रोही प्रशासन ! गणेशभक्तांकडून विश्वासाने घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे धार्मिक पावित्र्य जपून विसर्जन होणे अपेक्षित असतांना तसे केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. या कारणांमुळे श्री गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी आता तरी भाविकांनी श्री गणेशमूर्तीचे दान न करता वहात्या पाण्यात विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावे ! |