‘ईडी’कडून देशभरात ३० ठिकाणी धाडी !

देहलीतील आप सरकारकडून झालेल्या मद्य धोरण घोटाळ्याचे प्रकरण

नवी देहली – देहलीतील आप सरकारच्या मद्य धोरणातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी ‘ईडी’ने (अंमलबजावणी संचालनालयाने) ‘एन्.सी.आर्.’सह (राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासह) देशभरात धाड टाकणे चालू केले आहे. देशातील ३० ठिकाणी धाड टाकली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

यामध्ये देहलीसह गुरुग्राम, चंडीगड, लक्ष्मणपुरी, मुंबई, भाग्यनगर, तसेच बेंगळुरू या शहरांमध्ये धाड टाकणे चालू आहे. देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर सध्या धाड टाकण्यात आली नाही.

भाजपने प्रसारित केला व्हिडिओ !

याआधी आम आदमी पक्षावर आरोप करत भाजपने ५ सप्टेंबर या दिवशी एका ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये मद्य घोटाळ्यातील आरोपीचे वडील देहलीत मद्याचा परवाना घेतल्याचा दावा करतांना दिसत आहेत, तसेच त्यासाठी ‘कमिशन’ दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.