गुरु मडीवाळेश्वर मठाचे बसवसिद्धलिंग स्वामीजी यांची आत्महत्या !

बसवसिद्धलिंग स्वामीजी

बेळगाव – गुरु मडीवाळेश्वर मठाचे प्रमुख बसवसिद्धलिंग स्वामीजी यांनी त्यांच्या मठात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बैलहोंगला तालुक्यातील नेगिनहाळा गावात घडली. पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे. या प्रकरणी स्वामीजींनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘मी काहीही चुकीचे केलेले नाही. माझ्या मृत्यूचे कारण मीच आहे. कुणाचेही अन्वेषण करू नका. मला क्षमा कर आई. मठाच्या भक्तांनो, मला क्षमा करा. मठ समिती आणि भक्त यांनी मठाचे नेतृत्व करावे.’ या संदर्भात बसवसिद्धलिंग स्वामीजींच्या मठाच्या नावाचा उल्लेख करत एक ‘ऑडिओ क्लिप’ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाली होती. एका भाविकाने पोलिसांकडे तक्रार करून याचे अन्वेषण करण्याची मागणी केली होती.