प्रशासनाने अनुमती देतांना अडचणी निर्माण केल्यास आंदोलन करणार !

नाशिक येथील गणेशोत्सवाच्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांची चेतावणी !

इचलकरंजी येथे पंचगंगा नदीतच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होण्यासाठी आयुक्तांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय !

गेली २ वर्षे कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहापूर खाणीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्या वेळी नागरिक आणि मंडळे यांनी प्रशासनास सहकार्य केले; मात्र मंडळे पंचगंगा नदीतच विसर्जनास आग्रही आहेत.

कोकण विभागात ३७ लाखांहून अधिक राष्ट्रध्वजांचे वितरण करणार ! – डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण विभागीय आयुक्त

या उपक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रध्वजाची एकूण मागणी ३७ लाख ३९ सहस्र ११८ असून त्यांपैकी ३० लाख ५९ सहस्र ५०२ ध्वज उपलब्ध आहेत. केंद्रशासनाकडून ८ लाख ७९ सहस्र ४४४ ध्वजांची वाढीव मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे भोसरी (पुणे) येथील शिवसृष्टी आणि मेघडंबरी यांची दुरवस्था !

महापालिकेने येथील ऐतिहासिक प्रतिकृतींची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

निलंबित पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे यांच्यावर १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा नोंद !

शेतभूमीच्या दाव्याचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लागण्यासाठी निलंबित पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. तिवडे हे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

महंतांना धमकावणार्‍यांना फाशीची शिक्षा करा !

उत्तरप्रदेशातील ‘बडी संगत’ संप्रदायाचे महंत बजरंग मुनी यांना भ्रमणभाषवरून मौलाना मुश्ताक खान याने ‘सिर तन से जुदा’ची धमकी दिली आहे. १ वर्षापूर्वी काही मुसलमानांनी महंतांवर शस्त्रांद्वारे आक्रमणही केले होते.

पायथागोरसचे प्रमेय हे त्याच्या कालखंडाच्या आधी वेदकाळापासूनच ज्ञात होते !

कर्नाटक सरकारने ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०’मध्ये एक टिपण सादर केले आहे. त्यामध्ये ‘पायथागोरसचे प्रमेय हे त्याच्या कालखंडाच्या आधीच वेद काळापासून ज्ञात होते’, असे म्हटले आहे. यामध्ये ‘प्रमेय हे पायथागोरसचे आहे, हे पूर्णपणे चुकीचे आहे’, असे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वप्नातील स्वाभिमानी भारत निर्माण करणे आवश्यक !

आपल्या भारत देशात ३ प्रकारचे लोक रहातात. पहिले देश घडवणारे, दुसरे बघ्याची भूमिका घेणारे आणि तिसरे देशाचे तुकडे करू पहाणारे. या सर्वांमध्ये बघ्याची भूमिका घेणारे लोक अधिक आहेत.

आत्महत्येच्या संदर्भात भारतीय कायद्यांमध्ये असलेल्या विविध तरतुदी !

आत्महत्या करणारी व्यक्ती आधीच्या काही दिवसांत कुणाकुणाच्या संपर्कात होती ? त्यांचा एकमेकांशी संवाद कशा प्रकारे झाला ? त्यांचे कुणाशी आर्थिक व्यवहार होते का ? कौटुंबिक कलह होता का ?