पुणे – पुणे रेल्वे विभागात जुलैमध्ये तिकीट पडताळणी करतांना १९ सहस्र ८२९ प्रवासी तिकीट न घेता प्रवास करतांना आढळून आले आहेत. त्यांच्याकडून १ कोटी ५० लाख १६ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे, तसेच ५४५ जणांना अनियमित प्रवासासाठी २ लाख ८८ सहस्र रुपयांचा दंड आकारला आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीत १ लाख २५ सहस्र प्रकरणांमध्ये ८ कोटी ५७ लाख ६८ सहस्र रुपये दंड वसूल झाला आहे. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या साहाय्याने करण्यात आली आहे. ‘प्रवाशांनी तिकीट घेऊन प्रवास करावा, अन्यथा त्यांना दंड भरावा लागेल. दंड न भरल्यास तुरुंगवास होऊ शकतो’, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.
संपादकीय भूमिकासमाजाला शिस्त न लावल्याचा परिणाम ! |