प्रशासनाने अनुमती देतांना अडचणी निर्माण केल्यास आंदोलन करणार !

नाशिक येथील गणेशोत्सवाच्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांची चेतावणी !

नाशिक – ‘शहरातील गणेशोत्सव मंडळांना एकाच खिडकीतून सर्व अनुमती देण्यात यावी. महापालिकेसह पोलिसांनी अनुमती देतांना अडचणी निर्माण करू नयेत, अन्यथा ‘गणपति बसवा’ आंदोलन करून १० दिवस गणेशमूर्ती झाकून ठेवण्यात येईल’, अशी चेतावणी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ६ ऑगस्ट या दिवशी येथे आयोजित केलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत प्रशासनाला दिली आहे. या संदर्भात गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.