पदकांवरून अल्पसंतुष्टता नको !

इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे चालू असलेल्या ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धे’च्या ९ व्या दिवशी भारताने चांगली कामगिरी करून पदकांचा आलेख उंचावला आहे. भारताने अद्यापपर्यंत या स्पर्धेत १३ सुवर्ण, ११ रौप्य आणि १६ कांस्य अशा एकूण ४० पदकांची कमाई करून पदतालिकेत ५ वे स्थान गाठले आहे.

नागपूर येथे विभागीय आयुक्तपदी विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना !

विजयालक्ष्मी बिदरी-प्रसन्ना यापूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) येथे नियंत्रक पदावर प्रतिनियुक्तीने कार्यरत होत्या. या वेळी जिल्हाधिकारी आर्. विमलासह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

कराड जनता सहकारी बँकेच्या कर्मचार्‍यांच्या कर्जाची चौकशी करा !

कराड येथील ‘कराड जनता सहकारी बँके’च्या व्यवहारांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) चौकशी चालू आहे. आता बँकेच्या कर्मचार्‍यांना दिलेल्या कर्जाचीही पोलीस चौकशी करणार आहेत.

पतीची हत्या करून त्यास अपघात झाल्याचे भासवणारी पत्नी आणि तिचा प्रियकर यांना पोलीस कोठडी !

पोलिसांच्या अन्वेषणातून या हत्येमागील कारणाचा उलगडा झाला. अमरावती जिल्ह्याच्या सीमेलगत हत्या करून मृतदेह एका नाल्यात फेकून तो अपघात असल्याचे भासवण्यात आले होते.

सन सिटी ते कर्वेनगर या प्रस्तावित पुलाला तातडीने गती देऊन निविदा प्रक्रिया राबवावी !

भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांची मागणी

पोलिसांनी पैसे घेऊन कारागृहात पाठवल्यामुळे केली आत्महत्या !

उमेश जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत एक पुरुष आणि एका महिला यांनी पोलिसांना पैसे देऊन मला कारागृहात पाठवले; म्हणून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.

हिंदु जनजागृती समितीकडून यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्रशासनास निवेदने

हिंदु जनजागृती समिती गेल्या १९ वर्षांपासून प्रश्नमंजुषा, व्याख्याने, हस्तपत्रके, भित्तीपत्रके-फ्लेक्स, ध्वनीचित्रफीती, समाजमाध्यमे या माध्यमांतून, तसेच रस्त्यावर पडलेले ध्वज गोळा करणे यांद्वारे जनजागृती करत आहे.

शिक्षणाची वानवा !

एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरात साजरा होत आहे, तर दुसरीकडे काही समस्या संवेदनशीलतेने विचार करायला लावत आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘शिक्षण’ ! स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला सहजतेने आणि दर्जेदार शिक्षण मिळत नाही, हे अत्यंत क्लेशदायक अन् लोकशाहीला अशोभनीय आहे.

नाशिक येथे अज्ञात विकृतांनी पिसे उपटल्याने घायाळ मोराचा मृत्यू !

अज्ञात विकृतांनी पिसे उपटल्याने घायाळ झालेल्या कृष्णा नावाच्या मोराचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंपळगाव बसवंत येथे हा प्रकार घडला. एका संशयिताला वन विभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी कह्यात घेतले आहे.

सरकारची फसवणूक करणार्‍या धर्मांधाला मुंबईमध्ये अटक !

५ ऑगस्ट या दिवशी महाराष्ट्र राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाच्या अन्वेषण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.