राष्ट्रीय हिंदु वाहिनी संघाचे अध्यक्ष धर्मेंद्र शुक्ला यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

आश्रम पाहिल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. शुक्ला म्हणाले, ‘‘आश्रम पाहून मन प्रसन्न झाले. येथील व्यवस्थापन पुष्कळ उत्तम आहे. आश्रमाला लवकरच दुसर्‍यांदा भेट देण्याची प्रबळ इच्छा आहे.’’ 

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात २० जुलै या दिवशी सुनावणी होणार !

सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील ३ सदस्यीय पिठासमोर सुनावणी होईल. या निवाड्यावर शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सुनावणीमुळे २० जुलैला होणारा मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

हिंदु धर्माचा प्रसार केल्यास धर्माधिष्ठित राष्ट्र स्थापन होऊ शकते ! – सौ. गीता अच्युतन्, श्री श्री नारायणीय सत्संग

पालक्काड (केरळ) येथे भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा

७५ वर्षीय हिंदु वृद्ध व्यक्तीची तिच्या सुनेचा मुसलमान प्रियकर आणि सहकारी यांच्याकडून हत्या

कविता हिला संपत्तीमध्ये वाटा देण्यात न आल्याने ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी या चौघांना अटक केली आहे. परवेझ याला अटक करतांना त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता.

गेल्या ६ मासांत ‘ॲमेझॉन’चे जंगल मुंबईच्या साडेसहा पट क्षेत्रफळाएवढे नष्ट !

जागतिक तापमानवाढ, हवामान पालट आदी समस्यांनी रौद्र रूप धारण करण्यामागे अशी अनियंत्रित वृक्षतोडच कारणीभूत आहे ! प्रकृतीच्या असमतोलास उत्तरदायी असलेल्या अशा घोडचुकाच मानवाला नष्ट करतील, हे लक्षात घ्या !

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान पूर्ण : २१ जुलैला निकाल

या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आघाडीकडून द्रौपदी मुर्मू, तर काँग्रेससहित विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. २१ जुलै या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.

सनातन संस्थेच्या वतीने कर्नाटकमध्ये ३२ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

या महोत्सवात प्रारंभी सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर गुरुपौर्णिमेनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेनेची नवीन कार्यकारिणी घोषित !

शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुखपदी अजूनपर्यंत कुणाचीही नियुक्ती केलेली नाही.

पोस्टाची प्रतिवर्ष केवळ २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्त्यात १० लाख रुपयांची ‘विमा कवच’ योजना !

भारतीय डाक विभागाने ‘टाटा एआयजी’च्या अपघात संरक्षण विमा या योजनेशी करार करून प्रतिवर्ष २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्त्यात १० लाख रुपयांचे विमा कवच योजना चालू केली आहे. टपाल विभागाने देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही नवीन योजना आणली आहे.

वैदुवाडी (पुणे) येथील १५ झोपड्या जळून खाक

पुणे-सोलापूर रस्त्यावरील वैदुवाडी परिसरातील सुरक्षानगरमधील  झोपड्यांना १७ जुलैच्या मध्यरात्री २ च्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये १५ घरे जळून खाक झाली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.