अलमट्टी धरणातून केवळ ६ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू !

कोल्हापूर भागात पावसाची संततधार चालू झाल्याने पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात अलमट्टी (कर्नाटक) धरणातून १ लाख ५० सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू करण्यात आला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर शिवसैनिकांचा मोर्चा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी असणारे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी येथील घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला.

सांगलीत शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना व्हावा ! – नीता केळकर, भाजप

संरक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेसच्या काळामध्ये ‘आय.एन्.एस्. शिवाजी’ हे नौदलाचे अभियांत्रिकी महाविद्यालय जे महाराष्ट्रात होणार होते, ते स्थानांतर करून केरळमध्ये नेले, यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये असंतोष आहे.

हिंदूंच्या हितासाठी संघटित होण्याचा सातारा येथील हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

सकल हिंदु संघटनांच्या वतीने हिंदु जनजागृतीसाठी २४ जुलै या दिवशी सायंकाळी मिरवणूक आणि महाआरती यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु धर्मावर होणारे दैनंदिन आघात रोखण्यासाठी, तसेच हिंदूंच्या हितासाठी संघटित होण्याचा निर्धार उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी केला.

पुणे शहरात सराफी पेढीतून ५ किलो सोन्याची बिस्किटे चोरीस !

गुन्हेगारांनी मोठे गुन्हे करण्याला पोलिसांचा धाकच उरलेला नसणे कारणीभूत !

७० मीटरहून अधिक उंच इमारतींमध्ये ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ बंधनकारक ! – राज्य सरकार

राज्य सरकारने मुंबईसह राज्यातील उंच इमारतींमध्ये अग्नीसुरक्षेच्या दृष्टीने ‘फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट’ (आग लागल्यानंतर नागरिकांना बाहेर काढण्याचे उद्वाहन) बसवणे बंधनकारक केले आहे.

राज्यातील भिकार्‍यांचे राज्य सरकार पुनर्वसन करणार !

राज्यातील भीक मागणार्‍या व्यक्ती, तसेच बालके यांचा तपशील गोळा करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात येणार आहे.

इंधन समायोजन आकाराच्या नावाखाली थेट वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू ! – प्रताप होगाडे, वीजतज्ञ

राज्यातील घरगुती, व्यापारी, शेतकरी, औद्योगिक आणि अन्य सर्व २ कोटी ८७ लाख ग्राहकांवर जुलै २०२२ मध्ये मिळालेल्या देयकापासून ५ मासांसाठी ‘इंधन समायोजन आकार’ या नावाखाली थेट वीज आकाराच्या २० टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे.

राज्यातील ५ मोठ्या धरणांतील गाळ काढण्याचा निर्णय !

राज्यातील उजनी, गिरणा, गोसीखुर्द, जायकवाडी आणि मुळा या ५ जुन्या धरणांत साठलेला गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मागवण्यात येणार्‍या निविदा कागदपत्रांचे मानक प्रारूप सिद्ध करण्यासाठी राज्यशासनाने समिती स्थापन केली आहे.

‘आरे’मध्ये वृक्षतोडणीला विरोध करणारे पोलिसांच्या कह्यात !

‘आरे’ परिसरात वृक्ष तोडण्याची कारवाई चालू झाली असून याला विरोध करणार्‍यांना पोलिसांनी नोटिसा बजावून कह्यात घेतले आहे. येथील ‘कारशेड’चे काम चालू करण्यात आल्याची चर्चा या परिसरात आहे. आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटना यांनी आंदोलन चालू केले आहे.