राज्यातील भिकार्‍यांचे राज्य सरकार पुनर्वसन करणार !

मुंबई, २५ जुलै (वार्ता.) – राज्यातील भीक मागणार्‍या व्यक्ती, तसेच बालके यांचा तपशील गोळा करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी कृती दल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात येणार आहे. (काही जण भिकार्‍यांना साहाय्य करतात, तेव्हा भिकारी ते विकून परत भीक मागण्याचा व्यवसाय चालू करतात, असेही लक्षात येते ! – संपादक)

कोरोनाच्या कालावधीत पालकांचा मृत्यू झालेल्या बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडून जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या कृती दलाकडे हे सर्वेक्षणाचे दायित्व सोपवण्यात आले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली या कृती दलाचे काम चालणार आहे. यामध्ये मनोरुग्ण, अपंग, दुर्धर आजाराने पीडित भिकारी यांची माहितीही गोळा करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. १५ दिवसांतून एकदा कृती दलाची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे.

संपादकीय भूमिका

अध्यात्मशास्त्रानुसार प्रत्येकाची स्थिती प्रारब्धानुसार असते. साधना केल्यानेच एखाद्याचे प्रारब्ध पालटू शकते !