पुणे शहरात सराफी पेढीतून ५ किलो सोन्याची बिस्किटे चोरीस !

चोरी करणारी महिला पोलिसांच्या कह्यात !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागातील सराफी पेढीतून अडीच कोटी रुपये किंमतीची ५ किलो सोन्याची बिस्किटे चोरीस गेली. सोन्याची बिस्किटे चोरणार्‍या महिलेला फरासखाना पोलिसांनी खारघर येथून कह्यात घेतले. न्यायालयाने या महिलेला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवार पेठेतील ‘पोपटलाल गोल्ड पेढी’चे मालक राकेश सोलंकी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार प्रविष्ट केली आहे. संबंधित महिला सोलंकी यांच्या पेढीमध्ये सोने खरेदीसाठी नेहमी येत असल्याने सोलंकी यांची संबंधित महिलेशी ओळख झाली होती. पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संपादकीय भूमिका

गुन्हेगारांनी मोठे गुन्हे करण्याला पोलिसांचा धाकच उरलेला नसणे कारणीभूत !