अलमट्टी धरणातून केवळ ६ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू !

प्रतीकात्मक छायाचित्र

कोल्हापूर, २५ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर भागात पावसाची संततधार चालू झाल्याने पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात अलमट्टी (कर्नाटक) धरणातून १ लाख ५० सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू करण्यात आला होता. आता पाऊस उघडला असल्याने आणि नदीच्या पाण्याची पातळी १५ फुटांवर आल्याने अलमट्टी (कर्नाटक) धरणातून विसर्ग अत्यल्प करण्यात आला आहे. सध्या धरणातून केवळ ६ सहस्र घनफूट प्रतिसेकंद विसर्ग चालू आहे. १२३ टी.एम्.सी. क्षमता असणार्‍या धरणात सध्या ९७.५५ टी.एम्.सी. (७३.३० टक्के) पाणीसाठा आहे.