गोवंडी (मुंबई) येथे एकाच घरात आढळले ४ मृतदेह !

मुंबई – गोवंडीमधील शिवाजीनगर परिसरातील एकाच घरात ४ जणांचे मृतदेह आढळले आहेत. यामध्ये शकील खान, रजिया या पती-पत्नी यांसह २ अल्पवयीन मुलांचा मृतांमध्ये समावेश आहे. हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे पोलिसांचे प्राथमिक अनुमान आहे. प्रथम मुलांना विष देऊन त्यानंतर पती-पत्नी यांनी आत्महत्या केल्याचे अनुमान आहे. शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.