सुंठ चूर्ण, पिंपळी चूर्ण इत्यादी आयुर्वेदातील औषधांमध्ये पोरकिडे झाल्यास काय करावे ?

वैद्य मेघराज पराडकर

‘आल्याचा कंद, पिंपळीची फळे इत्यादी वनस्पती पदार्थांमध्ये पिष्टमय पदार्थांचे (स्टार्चचे) प्रमाण अधिक असते. त्यामुळे आल्यापासून बनणारे सुंठ चूर्ण, पिंपळीच्या फळांपासून बनणारे पिंपळी चूर्ण इत्यादी आयुर्वेदातील औषधांमध्ये तांदुळांत होतात त्याप्रमाणे पोरकिडे (बरड किंवा सोंडे) होतात. तांदुळांत पोरकिडे झाले, तर आपण तांदूळ टाकून देत नाही. ते चाळून वापरतो. त्याप्रमाणे सुंठ चूर्ण, पिंपळी चूर्ण इत्यादी औषधांमध्ये पोरकिडे झाले, तर ती चूर्णे टाकून न देता चाळून वापरू शकतो. अशी चूर्णे चाळून, डबीत भरून डबीचे झाकण घट्ट लावून कोरड्या वातावरणात ठेवावीत. पाऊस नसेल, तेव्हा ही चूर्णे उन्हात वाळवून डबीत भरून ठेवावीत. ही चूर्णे शीतकपाटात ठेवल्यास अधिक कालावधीसाठी सुरक्षित रहातात.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.७.२०२२)