आगरा येथे संपूर्ण कुटुंबाला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून मुलगी तिच्या मुसलमान प्रियकरासह फरार

आगरा (उत्तरप्रदेश) – येथे एका मुलीने तिच्या संपूर्ण कुटुंबाला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून दानिश नावाच्या मुसलमान प्रियकरासह फरार झाली. त्यांनी २ लाखांची रोकड आणि दागिने घेऊन पळ काढला. दानिशने मुलीला आमीष दाखवून बळजोरीने पळवून नेल्याचा आरोप करत मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध शाहगंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. मुलीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, मुलीने कुटुंबातील सर्व सदस्यांना जेवण दिले. थोड्या वेळाने सगळे जण गाढ झोपेत गेले. सकाळी विलंबाने जाग आली, तेव्हा मुलगी घरी नसल्याचे दिसून आले.

संपादकीय भूमिका

सरकारने या घटनेची चौकशी करून सत्य जनतेपर्यंत आणावे आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !