शिर्डी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ फेरीचे आयोजन !

शिर्डी (जिल्हा नगर) – ‘साईबाबा संस्थान’चे श्री साईबाबा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालय शिर्डी अन् भारत सरकारचे सूचना आणि प्रसारण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या अंतर्गत २५ जुलै या दिवशी ‘हर घर तिरंगा’ फेरीचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतीकारक, घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे आणि देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने ही फेरी काढण्यात आली होती.