बांगलादेशात हिंदूंच्या लोकसंख्येच्या टक्केवारीत घट !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशात झालेल्या जनगणनेमध्ये देशात ८ कोटी १७ लाख पुरुष, तर ८ कोटी ३३ लाख महिला असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक आहे. दुसरीकडे हिंदूंची टक्केवारी ७.९५ टक्क्यांवर घसरली आहे. वर्ष २०११ च्या जनगणनेमध्ये ही टक्केवारी ८.५ इतकी होती. आताच्या जनगणनेमध्ये बौद्ध लोकसंख्या एकूण ०.६१ टक्क्यांंवर आणि ख्रिस्त्यांची लोकसंख्याही ०.३० टक्क्यांवर आली आहे; मात्र मुसलमानांची लोकसंख्या ९१.४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

वर्ष २०११ मध्ये बांगलादेशची एकूण लोकसंख्या १४ कोटी ४० लाख होती, ती वर्ष २०२२ मध्ये १६ कोटी ५१ लाख इतकी झाली आहे. लोकसंख्या वाढीचा दर वर्ष २०११ मध्ये १.३७ टक्के होता. तो आता १.२२ टक्का इतका अल्प झाला असल्याचेही या जनगणनेमध्ये निष्पन्न झाले आहे.

वर्ष         हिंदूंची टक्केवारी
१९५१      २२
१९६१      १८.५
१९७४      १३.५
१९८१      १२.१
१९९१      १०.५
२००१       ९.२
२०११       ८.५
२०२२     ७.५५

संपादकीय भूमिका 

  • भारतापासून वेगळ्या झालेल्या मुसलमानबहुल देशांतील हिंदू आणि शीख यांची संख्या प्रतिदिन घटत आहे, याविषयी गेल्या ७५ वर्षांत भारत सरकारने एकदाही आवाज उठवला नाही कि हिंदु संघटनांनीही तसे करण्यासाठी सरकारवर दबाव आणला नाही, हे भारतातील हिंदूंना लज्जास्पद !
  • अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशांत हिंदूंची जी स्थिती झाली आहे, ती भविष्यात भारतात झाल्यास आश्‍चर्य वाटू नये. काश्मीरमध्ये आणि बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये हिंदूंनी हे अनुभवले आहे !