चिंचवड येथील ‘चिंचवडे लॉन्स’मध्ये ‘श्रावणमास तपोनुष्ठान’ सोहळा !

चिंचवड – येथील ‘चिंचवडे लॉन्स’मध्ये २८ जुलै ते २९ ऑगस्टपर्यंत ३२ व्या ‘श्रावणमास तपोनुष्ठान’ सोहळ्याचे आयोजन ‘ओम नम: शिवाय अधिष्ठान’च्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य संयोजक श्री. महेश स्वामी यांनी दिली आहे. श्री क्षेत्र काशीपिठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जन्म अमृत महोत्सवानिमित्त होणार्‍या या सोहळ्यामध्ये अडीच कोटी ‘ॐ नम: शिवाय’ नामजप यज्ञ, प्रतिदिन सकाळी ७ ते ८ नामजप, महास्वामी इष्टलिंगपूजा, दांपत्यपूजा त्यानंतर दुपारी महास्वामींचे दर्शन आणि महाप्रसाद, तर सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेमध्ये भजन, सांगितिक कार्यक्रम, महास्वामींचे आशीर्वचन अन् महाप्रसाद असा दैनंदिन कार्यक्रम आहे.