मुंबईत लोकल रुळावरून घसरल्याने लोकलची सेवा २ घंटे विस्कळीत !

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सी.एस्.एम्.टी.) स्थानकामध्ये लोकल रुळावरून घसरल्याने २ घंटे हार्बर मार्गावरील लोकलची सेवा विस्कळीत झाली होती. सकाळी ९.४० ते दुपारी १२.११ या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना मनःस्ताप सहन करावा लागला. सुदैवाने या घटनेत कुणीही घायाळ झाले नाही.