तांत्रिक बिघाडामुळे पुण्यातील पारपत्र कार्यालयाची सेवा विस्कळीत !

पुणे – तांत्रिक बिघाडामुळे पुण्यातील पारपत्र कार्यालयातील (पासपोर्ट ऑफिस) सेवा काही घंट्यांसाठी खंडित झाली. सर्व्हरच्या कामात अडथळे आल्यामुळे ही गैरसोय झाल्याचे पारपत्र कार्यालयाने स्पष्ट केले. पुण्यासह परभणी, गोवा आणि गुजरात येथेही पारपत्र कार्यालयांचे काम काही घंटे बंद होते.