स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ९ ते १७ ऑगस्ट ‘स्वराज्य महोत्सव’ ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘मोहिमेत जिल्ह्यासाठी ६ लाख ३ सहस्र राष्ट्रध्वज लागतील. नागरिकांनी ९०० मिमी बाय ६०० मिमी आणि ४५० बाय ३०० मिमीचे ध्वज घरावर लावावेत. राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी.’’

‘गटारी नव्हे, तर दीप अमावास्या’, असे फलक लावून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून समाजाचे प्रबोधन !

दीप (दिवे धुण्याच्या) अमावास्येला काही विकृत लोक गटारी अमावास्या असे संबोधून हिंदु धर्म अपकीर्त करतात. मुळात गटारी असा काही सण हिंदु धर्मात नाही. तरी शहरात ठिकठिकाणी ‘गटारी नव्हे, तर दीप अमावास्या’, असे फलक लावून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून समाजाचे प्रबोधन करण्यात येत आहे.

राज्यात १७३ जणांना ‘स्वाईन फ्ल्यू’ची लागण !

राज्यात ‘स्वाईन फ्ल्यू’चा (विशिष्ट विषाणूंमुळे येणारा ताप) धोका वाढत आहे. पावसाळा चालू झाल्यापासून या तापाचे रुग्ण वाढले आहेत.

सोलापूर येथे वाहतुकीचे नियम तोडणार्‍या २२ शालेय बस जप्त !

सोलापूर आणि अकलूज येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकांकडून विविध भागांत कारवाई करण्यात आली. शालेय बसचालकांना दंड करून त्यांच्याकडून २ लाख ७५ सहस्र ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत.

वागळे (चाळीसगाव) येथे पाटलीपुत्र एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाले !

चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या जवळच्या वागळे गावाजवळ एक्सप्रेसचे डबे आणि इंजिन वेगळे झाले. या घटनेत कुठलीही जीवित किंवा अनुचित घटना घडलेली नाही.

मुंबईमधील २३६ प्रभागांसाठी २९ जुलै या दिवशी आरक्षण सोडत !

महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रभाग आरक्षण सोडत २९ जुलै या दिवशी वांद्रे येथील बालगंधर्व रंगमंदिर सभागृह येथे काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या सोडतीमध्ये इतर मागासवर्गासाठी ६३ प्रभागांतील आरक्षण आणि महिला आरक्षण घोषित होणार आहे.

कृष्णा नदीत सातत्याने होणार्‍या माशांच्या मृत्यूप्रकरणी हरित लवादात याचिका !

साखर कारखान्यांच्या मळीमिश्रित घातक रसायनांमुळे कृष्णा नदीत लाखो मासे मृत होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. याला प्रशासकीय यंत्रणेची अनास्थाच कारणीभूत आहे. याकडे सातत्याने डोळेझाक करणार्‍या यंत्रणांच्या विरोधात ‘स्वतंत्र भारत पक्षा’चे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी हरित न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

शिवसेनेच्या वतीने पुरातत्व विभागाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ सेनापती कापशी (कोल्हापूर) येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन !

गड-दुर्गांवरील अतिक्रमणे आणि पडझड यांविषयी सुस्त असणारा पुरातत्व विभाग बंद का करू नये ?

सोलापूर येथे मराठी जैन साहित्य संमेलनाचे आयोजन !

महाराष्ट्र जैन परिषदेचे २५ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ येथील हुतात्मा स्मृती मंदिर येथे २९, ३० आणि ३१ जुलै या दिवशी आयोजित करण्यात आले आहे.

(म्हणे) ‘बाबासाहेब पुरंदरे यांचे विकृत लिखाण शिवाजी महाराज यांची अपकीर्ती करण्यासाठी होते !’

मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी ज्या पक्षाने अफझलखान वधाचे चित्र हटवण्यास भाग पाडून खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला, त्या पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी बोलणे हास्यास्पद होय.