कोकण विभाग रिक्शा-टॅक्सी महासंघाची चेतावणी
मुंबई – प्रलंबित भाडे दरवाढ करणे, परवानेवाटप बंद करणे, तसेच रिक्शा-टॅक्सी व्यवसायिकांसाठी महामंडळ स्थापन करून माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयी पुरवणे अशा विविध मागण्या मान्य न झाल्यास कोकण विभाग रिक्शा-टॅक्सी महासंघाने १ ऑगस्टपासून बेमुदत संपाची चेतावणी दिली आहे. या संपात ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांतील सुमारे अडीच लाख रिक्शाचालक सहभागी होणार आहेत. या संपामुळे प्रवाशांवर पुष्कळ मोठा परिणाम होऊ शकतो.