कावड यात्रेवरही धर्मांधांची वक्रदृष्टी !

संपादकीय 

रतातील विविध राज्यांत शिवमंदिरे असलेल्या काही ठिकाणी कावडीने पाणी आणून शिवलिंगास अभिषेक करण्याचे उत्सव साजरे केले जातात. उत्तराखंडमधील अनुमाने १ कोटी लोक गंगेचे पाणी शिव पिंडींवर जलाभिषेक करण्यासाठी प्रतिवर्षी कावडीने घेऊन जातात. याला ‘कावड यात्रा’ म्हणतात. विविध मंडळांचे असंख्य ट्रकच्या ट्रक भरून हे भाविक हरिद्वारला येतात. प्रत्यक्ष घागरीच्या कावडीमध्ये, तर काही जण प्लास्टिकचे कॅन किंवा अन्य डब्यांतही गंगाजल घेऊन हे भाविक जातात.

कावड परंपरेचा इतिहास

प्राचीन काळापासून बांबूच्या दोन टोकांना घागरी बांधून सिद्ध केलेल्या ‘कावडी’तून पाणी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्याची पद्धत होती. श्रावणबाळाने कावडीतून स्वत:च्या माता-पित्यांना यात्रेला नेले. संत एकनाथ महाराजांनी कावडीतून आणलेले गंगाजल तहानेने व्याकुळ झालेल्या गाढवाला पाजले, असे ऐतिहासिक उल्लेख आढळतात. एकनाथांनी त्यांच्या अभंगांतही कावड यात्रेचा उल्लेख केला आहे. एवढी जुनी ही परंपरा आहे. उत्तरेतील गंगानदीचे पाणी कावडीने नेऊन दक्षिणेतील रामेश्वरला अभिषेक करण्याचीही प्राचीन परंपरा होती. गंगेचे पाणी इच्छितस्थळी पोचवणार्‍या परंपरांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनीही आश्रय दिला होता. महाराष्ट्रातही अकोला, बीड, शिखर शिंगणापूर किंवा कोकणातील राजापूर आदी ठिकाणी कावडीने नदीचे पाणी आणून शिवपिंडीला अभिषेक करणे, असा उत्सव साजरा करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे.

हिंदूंच्या संघटनांवर आक्रमण

इतके दिवस हिंदूंच्या मिरवणुका, मंदिरे आदींवर असणारी धर्मांधांची वक्रदृष्टी आता कावड यात्रेच्या माध्यमातून हिंदूंच्या यात्रांवर पडली आहे. यावर्षी धर्मांधांनी नेहमीप्रमाणे पूर्वीच ठरवून या यात्रेतील यात्रेकरूंना विविध मार्गांनी त्रास देणे चालू केले आहे. अमरनाथसारख्या यात्रेवरील जिहाद्यांची वक्रदृष्टी आता भारताच्या अन्य भागांतही पडली आहे. उत्तर भारतात सध्या प्रारंभ झालेल्या कावड यात्रेवर जिहाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता खुद्द केंद्रीय गृहमंत्रालयानेच वर्तवली आणि यात्रेकरूंची सुरक्षा तात्काळ वाढवण्याचा आदेशही दिला. वरील धमकीमुळे २१ जुलैला हरिद्वार येथेच कावड यात्रेच्या मार्गावर संध्याकाळी नमाजपठण करणार्‍या धर्मांधांना पोलिसांनी कह्यात घेतले. उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात २४ जुलै या दिवशी कावड यात्रेच्या वेळी यात्रेकरूंच्या गर्दीत घुसलेल्या ‘नाझिम’ नावाच्या धर्मांध तरुणाला पोलिसांनी अटक केली. कावड यात्रेमध्ये सहभागी झालेल्या धर्मांधाने महंत मच्छेंद्र पुरी यांचा बराच काळ पाठलाग केला आणि त्यांची माहिती इतरांना पुरवून हेरगिरी केली. हिंदूंच्या धर्मगुरूंच्या जिवाचे बरे-वाईट करून त्यांना नेतृत्वहीन करण्याचा धर्मांधांचा डाव यातून स्पष्ट होतो. कुणी हिंदु कधी असे मुसलमानांच्या मिरवणुकीत जाण्याचे तरी धाडस करू शकतो का ? कंकरखेडा येथे दोन धर्मांधांनी या यात्रेत घुसून गंगाजलात थुंकण्याचा घृणास्पद प्रकार केल्याने यात्रेकरूंचा संताप अनावर झाला आणि त्यांपैकी हाती लागलेल्या एका धर्मांधाला त्यांनी चोपले, तसेच ‘रस्ता बंद’ आंदोलनही केले. मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारीमधील इब्राहिमपूर गावामध्ये काही धर्मांध मुसलमान महिलांनी कावड यात्रा रोखली. ‘हिंदूंनी दिलेल्या मार्गावरून मिरवणूक काढावी’, असे त्यांचे म्हणणे होते. या महिलांना कुणी पुढे केले ? धर्मांधांनी नेहमीप्रमाणेच वेगवेगळे निमित्त काढून वातावरण बिघडवण्याचा केलेला प्रयत्न वरील प्रत्येक घटनेतून स्पष्टपणे दिसतो.

एवढ्या मोठ्या गर्दीत धर्मांधांना शोधणे, हेही पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. पोलीस ‘या सर्व गुन्ह्यांच्या मुळाशी जाऊन धर्मांधांना या कृती करण्यास उद्युक्त करणारे नेमके कोण आहे ?’, हेही एकवेळ घोषित करतील; परंतु सरकारच्या साहाय्याने पोलीस प्रशासनाने हे मूळच नष्ट करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा या उपाययोजना नेहमीप्रमाणेच वरवरच्या ठरतील. ‘हिंदूंनी धर्माचरण आणि धर्मरक्षण यांसाठी पुढे येऊच नये, यासाठी सतत हिंदूंवर आक्रमण करून त्यांचे खच्चीकरण करायचे’, हा धर्मांधांचा डाव आहे.

हिंदूंनी धडा घेणे आवश्यक !

सध्या या कावड यात्रेमध्ये अनेक अपप्रकारही शिरले आहेत. येणार्‍या भाविकांच्या ट्रकमध्ये मोठ्या आवाजात ‘डी.जे.’वर (मोठ्या आवाजाची ध्वनीयंत्रणा) भक्तीगीते लावलेली असतात. यामध्ये भक्तीभावाचा भाग अत्यल्प किंवा कधी कधी तो नसतोच. धर्मशिक्षण आणि धर्माचरण यांच्या अभावामुळे ‘कावड यात्रा ही देवाची उपासना, म्हणजेच साधना आहे’, हा त्यातील मूळ उद्देश बहुसंख्यांकांकडून सध्या हरवला जात आहे. परिणामस्वरूप हिंदू त्यातून मिळणारे चैतन्य आणि आत्मबळ यांपासून वंचित रहात आहेत. याचाच एक बाह्य परिणाम म्हणजे धर्मांध आता या कावड यात्रेवरही आक्रमणे करू धजावत आहेत. खरेतर कावड यात्रेच्या निमित्ताने हरिद्वार या तीर्थक्षेत्री होणारे हिंदूंचे संघटन हे धर्मांधांच्या उरात धडकी भरेल, एवढे प्रचंड आहे. हरिद्वारचे गंगानदीवरील सर्व पूल या यात्रेकरूंनी पूर्णतः खचाखच भरलेले असतात. असे असूनही धर्मांध या यात्रेवर आक्रमण करू धजावत आहेत. हिंदूंनी संघटितपणाचे बळ दाखवणे आणि सरकारने सुरक्षायंत्रणा वाढवून दोषींवर कडक कारवाई करणे, या उपायांच्या समवेतच हिंदूंनी ही यात्रा अतिशय भक्तीभावाने काढून त्यातील चैतन्य मिळवणे महत्त्वाचे आहे. यासाठी उत्तरप्रदेशातील आध्यात्मिक संघटना आणि सरकार यांनी एकत्रितपणे या यात्रेतील अपप्रकार टाळण्ो अन् भक्तीभाव वाढवण्ो यादृष्टीने हिंदूंचे प्रबोधन करणेही आवश्यक आहे. त्यामुळे हिंदूंच्या संघटनाला एक आध्यात्मिक बळही प्राप्त होऊन त्यांची शक्ती वाढेल आणि धर्मांधांवर वचक रहाण्यास साहाय्य होईल !

कावड यात्रेवर होणारी धर्मांधांची आक्रमणे,ही त्यांना कुणाचेच भय राहिले नसल्याचे द्योतक !