शास्त्रोक्त आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच देवीच्या मूर्ती संवर्धनाचे कार्य हाती !

उत्तर महाराष्ट्रातील भाविकांचे आराध्य दैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री सप्तश्रृंगी निवासिनी जगदंबेच्या मुख्य मंदिरातील मूर्ती संवर्धनाचे कार्य हे पूर्णतः कायदेशीर गोष्टी पार पाडून, शास्त्रोक्त पद्धतीने, तसेच पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसारच हाती घेण्यात आले आहे

कोरोना महामारीच्या काळात गणेशोत्सवावर घातलेले निर्बंध राज्यशासनाने हटवले !

कोरोना महामारीच्या काळातील निर्बंधांमुळे सण साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या; पण आता सण साजरे करण्यावरील निर्बंध मागे हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यावर्षी सर्वच सण धूमधडाक्यात साजरे होतील, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले.

दिघा येथील माजी नगरसेवक नवीन गवते आणि अपर्णा गवते यांचा भाजपमध्ये प्रवेश !

गणेश नाईक म्हणाले, ‘‘नवीन गवते यांना विशिष्ट परिस्थितीत पक्ष सोडवा लागला, तरी ते मनाने आमच्यासमवेत होते. गवते हे संदीप नाईक यांच्या संपर्कात होते. सरकारकडे पाठपुरावा करून आपण दिघा येथील प्रलंबित प्रश्न सोडवू.’’

पुणे येथील ‘महिला आयोग आपल्या दारी’च्या ‘जनसुनावणी’मध्ये १०४ महिलांच्या तक्रारी !

महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमाच्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ‘जनसुनावणी’ कार्यक्रमामध्ये १०४ महिलांनी तक्रारी नोंदवल्या.

कोट्यवधींचा भूखंड असलेल्या ‘वरळी सी फेस’वरील सरकारची दुग्धशाळा आरे वसाहत येथे हलवणार !

मुंबईतील मध्यवर्ती आणि कोट्यवधी रुपयांचा भूखंड असलेल्या ‘वरळी सी फेस’वरील सरकारची दुग्धशाळा आरे वसाहतीच्या ठिकाणी हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

हडपसर येथील पोलीस उपनिरीक्षक सागर पोमन यांना लाच स्वीकारतांना अटक

हडपसर पोलीस ठाण्यामध्ये उत्तरप्रदेशातील गोमतीनगर येथील ३२ वर्षीय व्यावसायिकाने २० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार प्रविष्ट केली होती. तक्रारदाराला त्यांचे २० लाख रुपये परत मिळवून देण्यासाठी ठाण्यातील सागर पोमन यांनी त्यांच्याकडे ५० सहस्र रुपयांची मागणी केली

गोपालन केंद्र हटवून ती जागा नगरपालिकेने आरक्षित करू नये ! – सुनील पावसकर, अध्यक्ष, गोरक्षण बचाव समिती

‘श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट’च्या वतीने १०० वर्षांहून अधिक काळ असलेले गोपालनाचे सेवाकार्य यापुढेही असेच चालू रहावे, अशी समस्त गोप्रेमींची भावना आहे. या ठिकाणी पुन्हा आरक्षणाच्या हालचाली चालू झाल्याचे वृत्तपत्रातून समजत आहे.

कल्याण-डोंबिवली येथे वाहने चोरणारे मुसलमान अटकेत !

बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘ओएल्एक्स्’ या संकेतस्थळावरून चोरट्या वाहनांची विक्री करणारे मोहंमद अकबर अब्दुल अजीज शेख (वय २७ वर्षे) आणि अबू बकर उपाख्य जाफर अब्दुल अजीज शेख (वय २२ वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे बोगस (खोट्या)आधुनिक वैद्यांचा सुळसुळाट !

इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस आधुनिक वैद्य त्यांची दुकाने थाटत असतांना वैद्यकीय विभागाला लक्षात न येणे, हे गंभीर ! बोगस पदवी देणारे आणि पदवी नसतांना सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळणारे अशा दोघांनाही कठोर शासन करायला हवे !