कराड येथील गोरक्षण बचाव समितीच्या वतीने मुख्याधिकार्यांना निवेदन !

कराड – ‘श्री गोरक्षण संस्था ट्रस्ट’च्या वतीने १०० वर्षांहून अधिक काळ असलेले गोपालनाचे सेवाकार्य यापुढेही असेच चालू रहावे, अशी समस्त गोप्रेमींची भावना आहे. या ठिकाणी पुन्हा आरक्षणाच्या हालचाली चालू झाल्याचे वृत्तपत्रातून समजत आहे. महाराष्ट्र शासनाने कराड नगरपालिकेला संबंधित जागा गोरक्षणासाठी मिळावी, यासाठी पत्र पाठवले होते; परंतु नगरपालिकेने याविषयी आम्हाला अंधारात ठेवून कोणतीही माहिती अद्यापपर्यंत दिलेली नाही. तरी या ठिकाणचे गोपालन केंद्र हटवून त्या जागेवर आरक्षणाची कोणतीही कारवाई नगरपालिकेने करू नये आणि त्या ठिकाणी गोरक्षणाचेच आरक्षण असावे, या मागणीचे निवेदन १९ जुलै या दिवशी कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना देण्यात आले.
या वेळी राष्ट्रीय गोरक्षा वाहिनी, गोसेवा संघ, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष प्रसाद साळुंखे, गोरक्षा समितीचे सुनील पावसकर, अश्विन शहा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. रवींद्र डोंबे, हिंदु जनजागृती समितीचे मदन सावंत, तसेच सनातन संस्था, इस्कॉन आदी संस्थांचे साधक, स्थानिक व्यापारी, गोरक्षक आणि गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !