शिंदे गटाकडून वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरून हकालपट्टी !

शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव किरण साळी यांची शिंदे गटाकडून युवासेना राज्य सचिवपदी निवड करण्यात आली आहे. वरुण सरदेसाई यांची युवासेना राज्य सचिवपदावरून हकालपट्टी करण्यात आली.

पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पुरातत्व विभाग आणि प्रशासन यांना निवेदन

पुरातत्व विभागाने गडदुर्ग, ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, समाध्या यांचे संवर्धन करावे, या प्रमुख मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १८ जुलै या दिवशी पन्हाळा गड येथील पुरातत्व विभाग, तहसीलदार, तसेच नगरपरिषद येथील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

मुळशी (जिल्हा पुणे) तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के : ५०० मीटर भूमी दुभंगली !

टाटा पॉवरने ही भूकंपाची स्पंदने नसून भूमीतील विस्फोट, भूस्खलन आदी स्वरूपाच्या आघातजन्य घटनांमुळे धक्के बसल्याचा अंदाज वर्तवला आहे.

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा ९० वा वाढदिवस ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा !

अखंड विठ्ठलभक्तीचा ध्यास असणारे आणि भोळा भाव असणारे पू. राजाराम भाऊ नरुटे (पू. आबा) यांना ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १६ जुलै २०२२ या दिवशी येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात एका भावसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मुंबईस्थित सहकारी बँक रायगड सहकारी बँकेवर निर्बंध !

आरबीआयने सांगितले, ‘‘ठेवीदारांना बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून एकूण जमा रकमेतील १५ सहस्रांपेक्षा अल्प रक्कम काढण्याची अनुमती दिली जाऊ शकते.’’

वारकरी शिक्षण संस्थेतील ४३ मुलांना विषबाधा !

या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिले. विषबाधा झालेल्यांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 

शरद पवार यांनी शिवसेना फोडली, हे उद्धव ठाकरे यांना कधी लक्षात येणार ? – शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शिवसेना फोडली आहे, हे उद्धव ठाकरे यांच्या कधी लक्षात येणार ? शिवसेनेचे ५० आमदार पक्ष सोडून का गेले ? याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दांत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

श्री विठ्ठलाच्या प्रक्षाळपूजेनंतर नित्योपचार पूर्ववत् चालू !

यात्रेच्या कालावधीत अधिकाधिक वारकर्‍यांना श्री विठ्ठलाचे दर्शन व्हावे, यासाठी मंदिर २४ घंटे उघडे असते. त्यामुळे त्यानंतर प्रक्षाळपूजेच्या निमित्ताने ‘भक्तांसाठी अहोरात्र उभे राहून थकलेल्या विठुरायाचा क्षीण दूर व्हावा’, यासाठी देवाला तेल लावण्यात आले.

न्याययंत्रणेची दुःस्थिती !

न्यायव्यवस्थेला लोकशाहीचा एक स्तंभ मानला गेल्याने ‘विधीमंडळ आणि कायदेमंडळ हे एकमेकांना पूरक होऊन ते देश अन् जनता यांसाठी लाभदायक ठरले पाहिजेत’, असे अपेक्षित आहे; परंतु सध्या भारतातील न्यायव्यवस्थेतील यंत्रणेची स्थिती यापेक्षा विपरीत आहे.

ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येणार्‍या ‘विद्यामाता हायस्कूल’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश !

शहरातील ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून चालवण्यात येणार्‍या ‘विद्यामाता हायस्कूल’ची चौकशी करण्यासाठी ७ जणांची समिती स्थापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.