खात्यातून केवळ १५ सहस्र रुपये काढता येणार
रायगड – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मुंबईस्थित सहकारी बँक रायगड सहकारी बँकेवर निर्बंध आणले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती बिघडत असल्याने आर्बीआयने हा निर्णय घेतला. या निर्बंधांमुळे ठेवीदारांना खात्यातून केवळ १५ सहस्र रुपये काढता येणार आहेत. हे निर्बंध ६ मासांसाठी लागू असतील.
आरबीआयने सांगितले, ‘‘ठेवीदारांना बचत खाते, चालू खाते किंवा इतर कोणत्याही खात्यातून एकूण जमा रकमेतील १५ सहस्रांपेक्षा अल्प रक्कम काढण्याची अनुमती दिली जाऊ शकते.’’
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीडमधील श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला ६ लाख रुपयांचा दंड ठोठाण्यात आल्याचेही आर्बीआयने सांगितले.