बाबा वंगा यांची भविष्यवाणी : सायबेरियात जीवघेण्या विषाणूचा शोध लागेल !

अन्य एका भाकितात त्या म्हणाल्या होत्या की, वर्ष २०२२ मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह परग्रहवासियांकडून (‘एलियन्स’कडून) पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल. त्यानंतर हे ‘एलियन्स’ पृथ्वीवरील लोकांवर आक्रमण करू शकतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या १२ खासदारांसह लोकसभेच्या अध्यक्षांची भेट

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगत १२ खासदारांसह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘शिवसेनेच्या १९ पैकी १८ खासदारांचा मला पाठिंबा आहे’, असा दावा करत लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे …

१२ खासदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देहलीत पत्रकार परिषद !

शिवसेच्या १२ खासदारांचा स्वतंत्र गट स्थापण्यात येणार असून त्यांनी त्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले आहे. स्व. बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन आम्ही भाजप-शिवसेना या नैसर्गिक युतीचे सरकार स्थापन केले.

येत्या २ दिवसांत मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता !

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या आमदारांचे सदस्यत्व रहित व्हावे, यासाठी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर २० जुलै या दिवशी सुनावणी होणार आहे. या याचिकेवरील सुनावणी पुढे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन १-२ दिवसांमध्ये मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या ! – सुनील मोदी, शिवसेना

खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा निर्णय म्हणजे राजकीय आत्महत्या होय, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख सुनील मोदी आणि समन्वयक हर्षल सुर्वे यांनी पत्रकर परिषदेत केला.

‘गूगल मॅप्स’कडून औरंगाबादचे ‘संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ नामांतर !

आता ‘गूगल मॅप्स’वर ‘औरंगाबाद’ असे शोधले असता मराठीत औरंगाबाद आणि इंग्रजीत ‘संभाजीनगर’, तर ‘उस्मानाबाद’ असे शोधले असता मराठीत उस्मानाबाद अन् इंग्रजीत ‘धाराशिव’ असा उल्लेख आढळतो.

रायगड जिल्ह्यात गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला !

रायगड जिल्ह्यात १३ जुलै या दिवशी विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला. तेथे मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

पावसामुळे राज्यातील २ लाखांहून अधिक हेक्टर शेतीची हानी !

पावसाने उघडीप दिल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी ३२ फूट ९ इंच नोंदवली असून संभाव्य पूरस्थितीपासून कोल्हापूरकरांनी नि:श्वास सोडला आहे. सध्या राधानगरी आणि वारणा धरणे ७३ टक्के भरली असून दूधगंगा ६२ टक्के भरले आहे.

मीरारोड येथे भाजपच्या अल्पसंख्याक विभागाच्या महिला प्रदेशाध्यक्षांवर आक्रमण

आक्रमणकर्त्यांनी सुलताना यांची चारचाकी थांबवली आणि सुलताना यांना शिवीगाळ करत धारदार शस्त्राने आक्रमण केले. यात त्या गंभीर घायाळ झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.