श्री गणेशोत्सवाविषयी शास्त्र सांगणारी ४ भित्तीपत्रके उपलब्ध !

श्री गणेशोत्सवाच्या काळात गणेशभक्तांना धर्मशिक्षण देणे आणि समाजप्रबोधन करणे या उद्देशांनी पुढील १.५ फूट × २ फूट आकारातील भित्तीपत्रके नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहेत. या भित्तीपत्रकांसाठी प्रायोजक मिळवून त्यांचा प्रसारासाठी सुयोग्य वापर करावा.

साधकांना अंतर्मुख करून त्यांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची सांगड घालणारे अन् अखंड भावावस्थेत असलेले सनातनचे ७५ वे समष्टी संतरत्न पू. रमानंद गौडा !

पू. रमानंदअण्णा साधकांच्या मनावर गुरुदेवांची महानता बिंबवतात. ‘साधकांनी मनुष्यजन्माचे सार्थक करावे’, यासाठी ते साधकांना सतत अंतर्मुख करून त्यांची व्यष्टी आणि समष्टी साधना यांचे नियोजन करून देतात.

भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।। (भाव कसा असावा ?)

‘भाव तैसें फळ । न चले देवापाशी बळ ।।’ या संत तुकाराम महाराज यांच्या ओळींचा अर्थ सांगतांना संभाजीनगर येथील डॉ. विजयकुमार फड यांनी भावाविषयी केलेले विश्लेषण पुढे दिले आहे.

कर्करोगासारख्या दुर्धर आजारातही आनंदी रहाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असलेल्या नाशिक येथील (कै.) सौ. दीपाली आव्हाड (वय ५५ वर्षे) !

नाशिक येथील सौ. दीपाली दिलीप आव्हाड यांचे २८.१०.२०२१ या दिवशी निधन झाले. आषाढ कृष्ण अष्टमी (२०.७.२०२२) या दिवशी त्यांचे ९ वे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लोटे, जिल्हा रत्नागिरी येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके आणि चिपळूण येथील डॉ. (सौ.) साधना जरळी !

श्री. महेंद्र चाळके आणि चिपळूण येथील डॉ. (सौ.) साधना जरळी यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ठ्ये येथे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या वेळी सनातन संस्थेचे संत पू. रमानंद गौडा यांना आलेल्या अनुभूती

प.पू. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांच्या मार्गदर्शनाची चित्रफीत पहातांना ‘गुरुदेवांना पहातच रहावे’, असे वाटून अतिशय आनंद होणे

निधन वार्ता

येथील सनातनच्या साधिका सुनंदा व्हावळ यांचे पती सुरेश व्हावळ (वय ७४ वर्षे) यांचे १८ जुलै या दिवशी सकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार व्हावळ कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.