छत्तीसगड सरकार शेणानंतर आता गोमूत्र खरेदी करणार !

शेणाद्वारे खत, तर गोमूत्राद्वारे कीटकनाशक बनवण्यात येणार !

कन्नौज (उत्तरप्रदेश) येथील मंदिरात अज्ञातांनी फेकले मांस !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असल्याने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी सरकारने अधिक कठोर होऊन उपाययोजना काढणे आवश्यक आहे !

जयपूर येथे लव्ह जिहाद : हिंदु मुलीशी ‘निकाह’ केल्यास मिळतात २५ लाख रुपये !

जर मुलीशी निकाह करू दिला नाही, तर वडील आणि मुलगी यांचा शिरच्छेद करण्याची धर्मांधाची धमकी !

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये खाद्य पदार्थांचे पैसे ‘क्यू.आर्. कोड’द्वारे देण्याची व्यवस्था !

प्रवासी कोणताही खाद्य पदार्थ विकत घेतल्यावर ‘मेनू कार्ड’वरील मूल्यानुसार ‘क्यू.आर्. कोड’द्वारे पैसे देऊ शकतो. ‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये ही सुविधा लागू करण्यात येणार आहे.

पालिकेच्या पथकावर धर्मांधांचे प्राणघातक आक्रमण : भाजपचा नेता घायाळ

कावड यात्रेच्या मार्गावरील मांसविक्रीची दुकाने बंद करण्याच्या बरेली (उत्तरप्रदेश) पालिकेच्या आदेशाचे उल्लंघन !

आसाममधील सोनारी महापालिका क्षेत्रातील गोमांस विक्रीवरील बंदीवर गुवाहाटी उच्च न्यायालयाकडून नोटीस

मुजीब रोहमन आणि अन्य एकाने प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने हा आदेश दिला.

‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने जगभरात ८ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा !

अमेरिकेत ३, दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया आणि युरोपातील क्रोएशिया येथे प्रत्येकी १, एशिया पॅसिफिक येथे २, तर अन्य ठिकाणी १ असे ८ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.

इंदूर (मध्यप्रदेश) येथे ‘श्री गुरुपौर्णिमा महोत्सव’ आणि ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ भावपूर्णरित्या साजरा !

११ जुलै या दिवशी ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सवा’च्या अंतर्गत सकाळी प.पू. अच्युतानंद महाराज (प.पू. भाऊ बिडवई) यांचे नामदेव पायरीचे भजन झाले. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प.पू. अच्युतानंद महाराज रचित हिंदी आणि मराठी भजनांचा कार्यक्रम झाला.

पुणे येथे शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणार्‍या धर्मांधावर गुन्हा नोंद !

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन शरीर संबंधाचा ‘व्हिडिओ’ काढून तो प्रसारित करण्याच्या धमकीने तरुणीच्या खोलीच्या विक्रीतून आलेले पैसे, तिच्याकडील बचत आणि वेतन घेऊन ३३ लाख ९३ सहस्र ७२१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पावसाच्या उघडीपमुळे पंचगंगेला संथगतीने उतार : कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला !

१५ जुलैपासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी संथगतीने अल्प होत आहे. १६ जुलै या दिवशी राजाराम बंधारा येथे सकाळी १० वाजता पाण्याची पातळी ३७ फूट ९ इंच इतकी नोंदवली गेली. यामुळे पुराच्या धास्तीपासून कोल्हापूरकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे.