परात्परगुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूं कडून शिकणे’, या सनातन-निर्मित ग्रंथाचे प्रकाशन !

कोल्हापूर शहरात राजारामपुरी येथील ‘इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन’ येथे गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात सनातन-निर्मित ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधना प्रवास : खंड १, परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरूं कडून शिकणे’,..

जीवनावश्यक वस्तूंवरील ‘जी.एस्.टी.’च्या निषेधार्थ व्यापार्‍यांचा लाक्षणिक बंद !

केंद्र सरकारने जीवनावश्यक खाद्यपदार्थांवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर (जी.एस्.टी.)लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारपेठेतील व्यापार्‍यांनी एक दिवसाचा बंद पाळला होता.

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर झालेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ हिंदू संघटनांकडून निषेध !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केरळ येथील कार्यालयावर समाजद्रोह्यांनी ११ जुलै या दिवशी बाँबने आक्रमण केले. हे आक्रमण म्हणजे प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतियावर झालेले आक्रमण होय.

तिस्ता सेटलवाड विचारवंत कि अविचारवंत ?

ज्या वेळी हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात कारवाई होते, तेव्हा राज्यघटनेचे गोडवे गातांना जी मंडळी थकत नाहीत, ती मंडळी सेटलवाड यांच्यासारख्यांवर कारवाई झाल्यावर मात्र ‘अटक घटनाबाह्य’ अशा प्रकारे टीका करतांना दिसतात. अशांनी न्यायव्यवस्थेचा निर्णय स्वीकारून राज्यघटनेवरील निष्ठा दाखवून द्यायला हवी.

अनधिकृत वृक्षतोडप्रकरणी आकुर्डी येथील आस्थापनाला ४५ लाख रुपयांचा दंड !

लाखो रुपयांचा दंड केला तरी वृक्षतोडीमुळे होणारी हानी कधीही भरून निघणार नाही, तसेच पुन्हा वृक्ष वाढवण्यासाठी केले जाणारे कष्ट कसे भरून काढणार ?

महापालिकेला वाढीव पाणीपट्टीचा ९४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार !

महापालिकेला पाणीपट्टी करापोटी १०५.६ कोटी रुपये द्यावे लागत होते; मात्र नव्या जलदरा अन्वये २०० कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. जलसंपदा विभागाने राज्यातील घरगुती आणि औद्योगिक पाणीपट्टीत वाढ केली असून नवे दर १ जुलैपासून लागू करण्यात आले आहेत.

हिंदु अल्पसंख्य झाल्यावर होणारा परिणाम जाणा !

गढवा (झारखंड) येथील ९० टक्के मुसलमान असणार्‍या मानपूर गावातील सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे, तसेच शाळेतील ५ हिंदु विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.

समितीच्या संपर्कात येण्यापूर्वी आम्ही अनाथ !

आज काही हिंदुत्वनिष्ठ संघटना म्हणतात, ‘‘हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात येण्यापूर्वी आम्ही अनाथ होतो. समितीने आम्हाला कडेवर घेतले, चालायला शिकवले आणि आज आम्ही जे काही आहोत, ते केवळ समितीमुळे आहोत. कृतज्ञता !’’

हिंदु राष्ट्राच्या कार्यातील अन्य महत्त्वाचे उपक्रम !

वृत्तवाहिन्यांवर प्रखरपणे हिंदुत्वाची बाजू मांडणे !
राष्ट्र आणि धर्म विषयावरील फलक प्रदर्शने

धर्मसंस्थापना आणि हिंदु राष्ट्र निर्मिती यांचे बीजारोपण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात, तसेच समाजातील अपप्रकार दूर करण्यासाठी व्यापक मोहिमा राबवून हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या दिशेने नेणारे समाजोद्धारक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !