सनातनच्या साधकांमध्ये आध्यात्मिक स्तरावरील गुणवैशिष्ट्ये निर्माण करत असल्याविषयी कृतज्ञता !

कोणत्याही संकटांना न डगमगण्याइतकी ईश्वरावरील श्रद्धा आणि व्यापकता, नम्रता ही काही निवडक आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये अल्प-अधिक प्रमाणात सनातनच्या शेकडो साधकांमध्ये आहेत.

‘गुरुकृपायोग’ हा कलियुगांतर्गत कलियुगात जलद आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग सांगितल्याविषयी अपार कृतज्ञता !

स्वेच्छा, परेच्छा आणि ईश्वरेच्छा यांनुसार टप्प्याटप्प्याने प्रयत्न केल्याने मनोलय अन् बुद्धीलय होऊन प्रगती होते, हे शिकवलेत !
दोष आणि अहं हे वाईट शक्तींचे प्रवेशद्वार आहेत, हे शिकवलेत !

सर्वांगस्पर्शी चिरकाल टिकणारी ग्रंथसंपदा निर्मिल्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता !

जीवन आणि साधना यांचे प्रत्येक अंग, तसेच मूलभूत सूत्रे यांविषयी मार्गदर्शन करणारे ग्रंथ सनातन संस्थेने प्रकाशित केले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव असलेल्या ग्रंथांची निर्मिती केल्याविषयी कृतज्ञ आहोत गुरुदेवा !

ईश्वराप्रती आभार व्यक्त करणे म्हणजे कृतज्ञता !

ईश्वराप्रती सतत आभार व्यक्त करत रहाणे, या अवस्थेला कृतज्ञतेचा भाव म्हणतात. कृतज्ञता सतत व्यक्त केल्याने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो. गुरुकृपेने कृतज्ञतेचा भाव जागृत होतो आणि टिकून रहातो.

सहसाधकांची ‘समष्टी’ दिल्याविषयी कृतज्ञ आहोत !

हे भगवंता, आमच्या समवेत सेवा करण्यासाठी तू सहसाधकांची ‘समष्टी’ दिलीस. सहप्रवासी साधकांच्या संगतीनेच हा प्रवास आम्ही करू शकत आहोत. त्यांच्या सहकार्यानेच सेवा करणे शक्य होते. सहसाधकच आमचे गुण-दोष पारखू शकतात आणि आम्हाला त्याविषयी सांगू शकतात.

कृतज्ञता म्हणजे काय ?

जेथे जेथे ‘मी’चा विचार मनात असेल, तेव्हा ईश्वराविषयी किंवा त्याच्या कोणत्या तरी स्वरूपाविषयी जाणीव असणे आणि त्या जाणिवेचे श्रेयही ईश्वराला अर्पण करणे, याला ‘कृतज्ञता’ म्हणतात.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांविषयी हिंदुत्वनिष्ठांचाही कृतज्ञताभाव !

आक्रमक हिंदुत्व अंगीकारणारे, वैचारिक प्रबोधन करणारे, राजकीय क्षेत्रात वावरणारे, अगदी नेपाळसारख्या विदेशात कार्य करणाऱ्यांनाही ‘प.पू. डॉक्टरांमुळे कार्य करू शकलो’, म्हणून गहिवरून येत होते.