कावड यात्रेच्या मार्गावरील मांसविक्रीची दुकाने बंद करण्याच्या बरेली (उत्तरप्रदेश) पालिकेच्या आदेशाचे उल्लंघन !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथे कावड यात्रेकरूंच्या मार्गावरील बिर्याणी आणि मांस यांची विक्री करणारी दुकाने बंद करण्याचा आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आला होता. तरीही काही ठिकाणे दुकाने चालू होती. ही दुकाने बंद करण्यासाठी पालिकेच्या पथकासमवेत गेलेले भाजपचे नेते अंकित भाटिया आणि अन्य काही लोक यांच्यावर धर्मांधांनी तलवार अन् लाठी-काठी यांद्वारे आक्रमण केले. यात अंकित भाटिया घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या आक्रमणाच्या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण झाले आहे. या घटनेनंतर संतप्त हिंदूंनी येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. येथील रामजानकी मंदिराजवळ ही घटना घडली. या प्रकरणी ४ जणांना कह्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे
उत्तर प्रदेश के बरेली में मीट शॉप बंद करवाने की कार्रवाई से नाराज कुछ लोगों ने भाजपा नेता अंकित भाटिया पर हमला कर दिया। 4 आरोपितों को हिरासत में लिया गया है।https://t.co/p7NCDt69xf
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 15, 2022
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना भाजपच्याच नेत्यांवर अशा प्रकारे आक्रमण करण्याचे धर्मांधांचे धाडस होतेच कसे ? |
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’