‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या वतीने जगभरात ८ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा !

मुंबई – जगभरात ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’च्या (एस्.एस्.आर्.एफ्.च्या) वतीने ८ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. अमेरिकेत ३, दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया आणि युरोपातील क्रोएशिया येथे प्रत्येकी १, एशिया पॅसिफिक येथे २, तर अन्य ठिकाणी १ असे ८ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते.

झाग्रेब, क्रोएशिया येथे गुरुपूजनाच्या वेळी साधकांनी अनुभवली शांती !

झाग्रेब येथील एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक सौ. रेवती आणि श्री. बोयान बाल्याक यांच्या निवासस्थानी गुरुपौर्णिमा महोत्सव पार पडला. या वेळी सौ. सीता आणि श्री. व्लादिमिर चिरकोविच यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या वेळी एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. मिलुटिन पात्क्रांज यांनी पौरोहित्य केले. गुरुपूजनाच्या वेळी उपस्थित बर्‍याच साधकांनी शांती अनुभवली. साधकांना उत्साह जाणवत होता.