नागपूर येथे २ मासांत उष्माघाताचे ११ बळी !

उत्तरेकडील राजस्थानमधून येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे तापमानाचा पारा ४५ ते ४६ डिग्रीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या पुष्कळ वाढली आहे. गेल्या २ मासांत केवळ नागपूर येथे ११ लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे.

संभाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार आणि माजी महापौर यांच्या शिष्टमंडळाकडून पाणीटंचाई दूर होण्यासाठी अनेक सूचना !

अनेक वर्षांपासून असलेली पाणी समस्या न सुटणे हे गंभीर आहे. पाण्याचा प्रश्न न सुटल्यामुळे नागरिकांचा संयम संपून उद्या नागरिकांनी कायदा हातात घेतल्यास त्याचे दायित्व कोण घेणार ?

मुंब्रा पोलिसांनी धाडीमध्ये ६ कोटी रुपये घेतल्याचे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित !

मुंब्रा पोलिसांवर तब्बल ६ कोटी रुपये वसुलीच्या आरोपाचे पत्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची पोलीस उपायुक्तांच्या माध्यमातून चौकशी करण्यात येत आहे.

सनातन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ !

हरियाणात ५ सहस्र वर्षांपूर्वीची दागिने बनवण्याच्या मोठ्या व्यवसायाची जागा नुकतीच मिळणे किंवा तमिळनाडूत ४ सहस्र २०० वर्षांपूर्वी लोखंड वापरले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधीमंडळात सांगणे यांसारख्या गोष्टी हिंदु संस्कृतीची महानता पुन:पुन्हा सिद्ध करत आहेत. असे असतांना अरिफ खान यांना ‘हीच गोष्ट योग्य शिक्षणाद्वारे शिकवली गेली पाहिजे’, असे वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे !

संभाजीनगर येथे देवमुद्राच्या शिष्यांकडून नृत्यसाधना कार्यक्रम !

जागतिक नृत्यदिनानिमित्त ‘देवमुद्रा अ मूव्हमेंट स्कूल’ संस्थेच्या वतीने नृत्यसाधना कार्यक्रम ९ मे या दिवशी घेण्यात आला.

नवी मुंबईतील एम्.जी.एम्. रुग्णालयात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू !

कळंबोली येथील एम्.जी.एम्. रुग्णालयात ४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. पाठीवर गाठ आली असल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भरती केले होते.

बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणारे वडील आणि मुलगा यांना अटक !

अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत !

ब्राह्मण समाजाला शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपच्या जिल्हाध्यक्षांवर गुन्हा नोंद !

भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी ब्राह्मण समाजाला उद्देशून शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर ३ मे या दिवशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड जंक्शनचा उड्डाणपूल पुढील १२ दिवस बंद !

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड जंक्शनचा उड्डाणपूल पुढील १२ दिवस बंद रहाणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी १३ ते २४ मेपर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील.

नाशिक येथे १४ लाखांचे विदेशी मद्य जप्त !

नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा निर्मित तब्बल १४ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आणि १० लाख रुपयांचे वाहन, असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल ९ मे या दिवशी जप्त केला आहे.