ठाणे शहराला मिळणार १० एमएलडी अतिरिक्त पाणी !

ठाणे शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन ठाणे शहराला मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे अतिरिक्त पाणीपुरवठा व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

हिंदु जनजागृती समितीने रेंदाळ (जिल्हा कोल्हापूर) येथे रोवलेल्या धर्माच्या बीजाचा वटवृक्ष होईल ! – रघुनाथ पाटील, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्मासाठी केलेले बलीदान आपण कायमच स्मरणात ठेवले पाहिजे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रत्येक वर्षी बलीदान मासाच्या माध्यमातून त्यांचे स्मरण कायम तेवत ठेवतो.

उल्हासनगर येथील भ्रमणभाषसंचांच्या दुकानात चोरी करणारा धर्मांध अटकेत !

१८ लाख ७२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, गुन्हेगारी करण्यात धर्मांधच प्रत्येक वेळी पुढे असतात, हे आजवरच्या अनेक घटनांमधून दिसून येते !

नाशिक जिल्हा बँकेतील ३०० कोटी रुपयांच्या कर्जमाफी घोटाळा प्रकरणी पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश !

महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत  जिल्ह्यात ३०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून जिल्हा बँकेने हे पैसे लाभार्थ्यांऐवजी थेट मोठ्या खातेदारांना अनियमित पद्धतीने उपलब्ध करून दिले आहेत

परभणी येथे निकृष्ट दर्जाचे बांधलेले उड्डाणपुलाचे खांब पाडले !

निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या कंत्राटदाराला रेल्वे अधिकाऱ्यांचा हिसका !, कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याप्रकरणी त्याचे पैसेही वसूल करून घ्यायला हवेत !

उल्हासनगर महानगरपालिकेत कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी !

देयकासाठी मुख्यालयातील लिपिकाला मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा नोंद !

नाशिक येथील मनसे शहराध्यक्ष पुन्हा तडीपार; जिल्हाध्यक्षांना अटक !

हनुमान चालिसा प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यावर पसार होऊन अटकेनंतर जामीन मिळालेले मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना साहाय्यक पोलीस आयुक्तांनी १० दिवसांसाठी तडीपार केले आहे.

मनसेचे संदीप देशपांडे यांच्या जामिनावर १७ मे या दिवशी सुनावणी !

मनसचे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसेचे संतोष धुरी यांच्या जामिनाच्या अर्जावर १७ मे या दिवशी सुनावणी होणार आहे. न्यायाधीश उपस्थित राहू न शकल्यामुळे १० मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात या जामिनावर सुनावणी होऊ शकली नाही.

माझ्यावर गुन्हे नोंद करण्यामागे राजकीय षड्यंत्र ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर बलात्कार करणे आणि धमकावणे या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने नाईक यांना अटकपूर्व जामीन दिला आहे. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

जून-जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता ! – आरोग्यमंत्री

कोरोनाची रुग्णसंख्या सध्या वाढत असतांना परिस्थिती मात्र नियंत्रणात आहे; मात्र अशा स्थितीतही चौथी लाट येण्याचा धोका आहे. जून-जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.