(म्हणे) ‘टिळकांनी शिवस्मारकासाठी गोळा केलेला निधी हडप केला !’
श्रीमंत कोकाटे यांच्याकडून लोकमान्य टिळकांचा अवमान
श्रीमंत कोकाटे यांच्याकडून लोकमान्य टिळकांचा अवमान
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत. यामध्ये कारवाईसाठी कुणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांना दिली.
मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते महेश भानुशाली यांना घाटकोपरमधून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयातून भोंगे, तसेच हनुमान चालिसा पठण करण्यासाठीचे साहित्यही जप्त केले आहे.
मुसलमानांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करणाऱ्या पोलिसांनी कधीतरी हिंदूंसाठीही दिवाळी पहाट, गुढीपाडवा शोभायात्रा, दसऱ्याच्या शुभेच्छा देणे किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मसाला दूध वाटप, असे कार्यक्रम आयोजित केलेत का ?
‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ही विक्री संपूर्ण शहर, सात रस्ता, पार्क चौक यांसह विविध ठिकाणी टँकरच्या माध्यमातून दूध विक्री करण्यात आली. हिंदूंच्या सणानिमित्त सवलतीमध्ये दूधविक्री केल्याचे ऐकिवात नाही, हे विशेष !
सण-उत्सवांच्या काळात वृत्तपत्रात छापून येणारी देवतांची चित्रे दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या कडेला किंवा कचऱ्याच्या डब्यात आढळून येतात. वृत्तपत्रांमध्ये देवीदेवतांची चित्रे छापण्यावर बंदी घालण्यात यावी, या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी आपल्याला गुरुकृपायोगानुसार साधना सांगितली. त्यानुसार तंतोतंत प्रयत्न केल्यास आपण सर्वांतून मुक्त होऊ शकतो. अगदी सर्वसामान्य जीवसुद्धा पुढच्या स्तराचे अनुभवू शकतो.
मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानावर रमजान ईदच्या दिवशी नमाजपठणासाठी अनुमती दिली होती; मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था याविषयी प्रश्न उपस्थित केल्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने अनुमती रहित केली.
अन्य राज्यांतील काही लोक महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट करत आहेत, अशी माहिती राज्य गुप्तचर विभागाकडून गृहमंत्र्यांना देण्यात आली.
शहराच्या दृष्टीने सार्वजनिक हिताच्या उपक्रमास पोलीस संरक्षण नाकारणे अनाकलनीय आहे. असे करून पोलीस एकप्रकारे अतिक्रमणांना संरक्षणच देत आहेत, असे नागरिकांना वाटल्यास चूक ते काय ?