रमजान ईदच्या निमित्ताने सोलापूर येथे जिल्हा दूध संघाच्या वतीने प्रतिलिटर ४५ रुपयांनी दूधविक्री !

रमजान ईदच्या निमित्ताने दूध विक्री

सोलापूर – येथे रमजान ईदच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा दूध संघाच्या वतीने प्रतिलिटर ४५ रुपये प्रमाणे दूध विक्री करण्यात आली. या विक्रीला २ मेच्या सायंकाळपासून प्रारंभ करण्यात आला होता. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ही विक्री संपूर्ण शहर, सात रस्ता, पार्क चौक यांसह विविध ठिकाणी टँकरच्या माध्यमातून दूध विक्री करण्यात आली.

रमजान ईदच्या दिवशीही शहरात दूध वितरण करण्यात आले, तसेच सोलापूर जिल्हा दूध संघाच्या वतीने सोलापूरसह गुलबर्गा, शहाबाद, विजापूर, गाणगापूर, अफजलपूर, उमरगा, बसवकल्याण, लातूर, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ या ठिकाणीही दूध विक्रीची सोय करण्यात आली होती.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या सणानिमित्त सवलतीमध्ये दूधविक्री केल्याचे ऐकिवात नाही, हे विशेष !