कारवाईसाठी कुणाच्याही आदेशाची वाट पाहू नका ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलावीत. यामध्ये कारवाईसाठी कुणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांना दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या वेळी गृहमंत्र्यांनी राज्यातील स्थितीविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली.