उषा तांबे यांची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड !

उषा तांबे

उदगीर, २४ एप्रिल (वार्ता.) – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचा अध्यक्षपदाचा कालावधी संपल्याने मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत मुंबई साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांची साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ही निवड ३ वर्षांसाठी असेल.

साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद हे वर्तुळाकार पद्धतीने महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, विदर्भ साहित्य संघ, मुंबई साहित्य संघ आणि मराठवाडा साहित्य परिषदेकडे असते. यंदा ते मराठवाडा साहित्य परिषदेकडे होते. त्या अंतर्गत कौतिकराव ठाले पाटील यांची निवड झाली होती. प्रत्येक ३ वर्षांनी हे अध्यक्षपद संबंधित विभागांकडे दिले जाते.