वणी (यवतमाळ), २४ एप्रिल (वार्ता.) – येथील बाजारपेठेत अनेक दुकानदारांची फसवणूक करणारी टोळी कार्यरत आहे. यात २ तरुण आणि १ तरुणी असून बोलण्यात वा एखाद्या कृतीत गंतवून ठेवून फसवणूक करतात, असे लक्षात आले आहे. पटवारीनगरमधील औषधांच्या दुकानातील ‘सीसीटीव्ही’मधून ही टोळी चोरी करत असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अन्वेषण करत आहेत.