कायद्याच्या चौकटीत राहून अजान ध्वनीक्षेपकावरूनच देणार ! – पुण्यातील मुसलमान संघटनांची भूमिका

पुणे – पुण्यातील ५०० मशिदींना आम्ही ध्वनीक्षेपक अनुमती संबंधी अर्ज पाठवले आहेत. त्यातील अनेक ठिकाणी अनुमती आहे. मशिदींचे व्यवस्थापन करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची व्यवस्था केली जात आहे, असे अवामी महाजचे अध्यक्ष डॉ. पी.ए. इनामदार यांनी सांगितले. मुसलमान संघटना आणि मशिदींच्या प्रतिनिधींची बैठक २१ एप्रिल या दिवशी अवामी महाज या सामाजिक संघटनेने बोलवली होती. त्या वेळी ते बोलत होते. शहरात कायद्याच्या चौकटीत राहून अजान ध्वनीक्षेपकावरूनच दिली जाईल, अशी भूमिका पुण्यातील मुसलमान संघटनांनी घेतली आहे.