सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी अमोल मिटकरी यांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट !

मिरज येथील गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देतांना ‘मिरज शहर ब्राह्मण परिवार महाराष्ट्र’चे कार्यकर्ते

कोल्हापूर, २४ एप्रिल (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज आणि पुरोहित वर्ग यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या, तसेच बीड येथे निवेदन देण्यात आले.

सांगली

सांगली पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम (उजवीकडे) यांना निवेदन देतांना अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते

१. मिरज शहर ब्राह्मण परिवार महाराष्ट्रच्या वतीने महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. या वेळी सर्वश्री ओंकार शुक्ल, किशोर पटवर्धन, विनोद गोरे, हेमंत गलांडे, सुमेध ठाणेदार, सुधीर गलांडे, नीलेश साठे, भास्कर कुलकर्णी, राजकुमार काकीर्डे, संदीप शेगुणशी, हेमंत गलांडे, विनोद गोरे, अभय आठवले, आनंद आठवले यांसह समाजबांधव उपस्थित होते.

२. विश्रामबाग येथे पोलीस मुख्यालयात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री. मंगेश ठाणेदार, पुरोहित आघाडी अध्यक्ष श्री. अमोल कुलकर्णी, सर्वश्री प्रथमेश वैद्य, केदार मेहेंदळे, सोमनाथ गाडगीळ, रणजित पेशकार, सचिन परांजपे, प्रसन्न चिपलकट्टी, विनय देशपांडे उपस्थित होते.

३. दलीत महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत लोखंडे यांनी मिरज येथे गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

कोल्हापूर

इचलकरंजी येथे श्री परशुराम बहुउद्देशीय सेवा संस्था, समस्त ब्राह्मण समाज, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने कॉ. के.एल्. मलाबादे चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी मिटकरी यांच्या प्रतिकात्मक फलकास जोड्याने मारत फलकाची होळी करण्यात आली. या वेळी सर्वश्री दिग्विजय कुलकर्णी, दत्तात्रय निगुडकर, संतोष कुलकर्णी, संजय कुलकर्णी, भगवंत कुलकर्णी, नितीन कुलकर्णी, पराग पेठे यांसह अन्य उपस्थित होते.

बीड

बीड येथे आमदार मिटकरी यांच्या विरोधात तक्रार देतांना कार्यकर्ते
बीड येथे आमदार मिटकरी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करतांना कार्यकर्ते

अमोल मिटकरी यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी विविध संघटना, भाजप यांच्या वतीने बीड येथे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी आमदार मिटकरी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.