औरवाड (जिल्हा कोल्हापूर), २४ एप्रिल (वार्ता.) – गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेचे श्री. नितेश ओझा, तसेच अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे श्री. अंकुश गोडसे यांना विश्वसनीय सूत्रांकडून श्री क्षेत्र नरसोबाचीवाडी जवळील औरवाड मध्ये गायींची कत्तल होत असल्याविषयी माहिती प्राप्त झाली. काही खिल्लार वंशाच्या गायी शेतात रात्री कत्तलीसाठी नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी रात्री १ वाजता कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे अंमलदार चव्हाण आणि तेली यांच्या साहाय्याने औरवाड येथील बेपारी यांच्या गल्लीत काही घरांमध्ये धाड टाकली. घराघरांमध्ये अवैध पशूवधगृहे आहेत. येथे कत्तल केलेल्या अनेक गायींची तोंडे, हाडे, चरबी, शिंगे, मांस, कातडी आणि रक्त इत्यादी सापडले. या वेळी १५ देशी गायींना त्यांची कत्तल होण्यापूर्वीच वाचवण्यात यश आले. यात २ दिवसांच्या खिल्लार जातीच्या बछड्याचा समावेश आहे. (प्रत्येकवेळी गोवंशांची कत्तल करण्याची माहिती गोरक्षकांनाच कशी मिळते याचा विचार पोलिसांनी करायला हवा. पोलिसांनी गोवंशाचे रक्षण करण्यासाठीचे प्रयत्न वाढवणे आवश्यक ! – संपादक)
या प्रकरणी औरवाड येथील अल्ताफ अकबर बेपारी, मौला बाशा बेपारी, जाकीर अकबर बेपारी या तिघांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे. (धर्मांधांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादक) या प्रकरणी १ लाख २३ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदरील गोवंश ‘वेद खिल्लार गोशाळा, निमशिरगाव’ येथे पुढील संगोपनासाठी पाठवण्यात आले आहे. सदर गोशाळेत सद्यःस्थितीत १५५ गोवंश आहेत. गोशाळेमध्ये सर्व गोवंशांचा दररोजचा खर्च जवळपास ६ सहस्र रुपये आहे. सद्यःपरिस्थितीत गोशाळेवर आर्थिक भार पुष्कळच आहे. त्यात हा अधिकचा व्यय पेलणे पुष्कळच अवघड आहे. गोरक्षण हे सामाजिक कार्य आहे त्यासाठी एक दिवस, १ मासाचा वैरणीचा व्यय गोप्रेमींनी द्यावा, असे आवाहन गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे.
गोविज्ञान आणि गोसंवर्धन संस्था, खाते क्रमांक ४२४२०२०१०५०७९०३, युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा – सांगली
IFSC: UBIN0542423, UPI Id : govigyan@ybl